Thu, Mar 21, 2019 15:28होमपेज › Sangli › दुर्धर आजारी २७५ बालकांना नवजीवन

दुर्धर आजारी २७५ बालकांना नवजीवन

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 16 2018 9:25PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

दुर्धर आजारी 275 बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाने नवजीवन मिळाले आहे. अतिखर्चिक हृदयशस्त्रक्रिया, कॅन्सर व इतर शस्त्रक्रियांकरिता मुख्यमंत्री सहाय्य निधीतून कोट्यवधी रुपयांची मदत झाली. त्यामुळे मोफत शस्त्रक्रिया झाल्या आहेत. शस्त्रक्रिया झालेल्या बालक व पालकांचा आनंद मेळावा गुरूवारी दुपारी 1 वाजता जिल्हा परिषदेत होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आरोग्य सभापती तम्मनगौडा रवि यांनी दिली.

या बालकांना हलाखीच्या  आार्थिक परिस्थितीने  महागडे उपचार शक्य नव्हते.  मात्र राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामुळे या बालकांना नवजीवन मिळाले. यासाठी योगदान दिलेल्यांचा सत्कार गुरुवारी होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे, मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते राजेश सोनार, राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या विभागीय कार्यक्रम अधिकारी आशा कुडचे यांचा सत्कार  गुरूवारी होणार आहे. जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, उपाध्यक्ष सुहास बाबर, आरोग्य सभापती तम्मनगौडा रवि  उपस्थित राहणार आहेत.  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे  प्रमुख पाहुणे आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, शल्यचिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ. मिलींद पोरे, डॉ. शहानवाज नाईकवाडे  स्वागतोत्सुक आहेत.