Sun, Jul 21, 2019 06:10होमपेज › Sangli › संभाजी भिडेंच्या सन्मानार्थ हजारो कार्यकर्ते एकवटले

संभाजी भिडेंच्या सन्मानार्थ हजारो कार्यकर्ते एकवटले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा
पुणे, मुंबई आणि सांगलीसह राज्यातील विविध शहरात महामोर्चा


सांगली : पुढारी ऑनलाईन

श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ बुधवारी सांगली, पुणे आणि मुंबईसह राज्यातील इतर शहरात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. सांगलीतील विश्रामबागमधून मोर्चाला सुरुवात झालेला महामार्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. पुण्यासह मुंबईतील आझाद मैदानावर देखील संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते एकवटले असून त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली.  

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील मोर्चात संभाजी भिडे सहभागी होणार नसल्याचे शिवप्रतिष्ठानने स्पष्ट केले आहे. मोर्चामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. एकबोटे यांच्याप्रमाणे भिडे यांना अटक करण्यात यावी, यासाठी सोमवारी मुंबईत मोर्चा निघाला होता. त्यानंतर राज्यभरातील विविध शहरासह आता हिंदुत्ववादी संघटनांकडून संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ हा मोर्चा काढला आहे.

असा असेल सांगलीतील मोर्चाचा मार्ग

सकाळी दहाच्या सुमारास कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून या मोर्चाला प्रारंभ करण्यात येणार आहे. राम मंदिर चौक, काँग्रेस भवन, आझाद चौकमार्गे मोर्चा स्टेशन चौकात जाणार आहे. तेथे निवेदन वाचन झाल्यानंतर मोर्चाचा समारोप होणार आहे. 

 

लाईव्ह अपडेट्स

* सातारा : संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यासाठी साताऱ्यातही मोर्चा काढण्यात आला.

 

सोलापूर : श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ  सोलापुरातही कार्यकर्ते रस्त्यावर 

* सांगली :  कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून होणार असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी  

* सांगली :  . मोर्चात महिला-युवकांचा मोछ्याप्रमाणात सहभाग 

* सांगली :  विश्रामबागमधील मध्यवर्ती कल्पद्रुम क्रिडांगणाजवळ, तसेच सांगलीत डॉ आंबेडकर स्टेडीयमजवळ पार्किंग व्यवस्था 

* सांगली : राखीव पोलिस दल, शिघ्र कृती दलासह जिल्हा पोलिस दलाचे साडेसातशेंचा फौजफाटा 

#  वाचा सविस्तर बातमी- भिडे गुरुजींवरील खोटे आरोप मागे घ्या, आझाद मैदानावर एल्गार

* मुंबईत जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी आरोप करणाऱ्यांची नार्को टेस्ट घ्यावी अशी मागणी केली आहे.

#  वाचा सविस्तर बातमी- पुण्यातही दुमदुमला भिडे गुरूजी निर्दोषचा आवाज

* पुणे : पुण्यातील मोर्चात कोरेगाव भीमा परिसरातील कार्यकर्ते देखील सहभागी झाले   

* सांगली:  भगवे झेंडे आणि गांधी टोप्या या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या ओळखीसह कार्यकर्ते चौका चौकातून शिवरायांचा जयघोष करीत सांगली-मिरज रस्त्याच्या दिशेने येत आहेत. 

* सांगलीत मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त 

* पुण्यात लाल महालापासून महामोर्चाला परवानगी नाकारल्याने नदी पात्राच्या मार्गे मोर्चाला सुरुवात  

Image may contain: one or more people, crowd and outdoor

* मुंबईतील आझाद मैदानावर संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

 

Tags : sangli, sangli news, Bhide supporter, Maha Morcha, Today, Sangli 


  •