Sun, Mar 24, 2019 08:18होमपेज › Sangli › श्रवणबेळगोळ महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून गर्दी

श्रवणबेळगोळ महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून गर्दी

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 11:54PMश्रवणबेळगोळ : सुनील पाटील

श्रवणबेळगोळ येथे ऐतिहासिक  महामस्तकाभिषेक   महोत्सव  उत्साहात व भक्तिभावाने संपन्न होत आहे. सोहळ्यात पंचामृतातील जलाभिषेक, दुग्धाभिषेक, हळद अभिषेक, कस्कचूर्ण अभिषेक, गंध चंदनाभिषेक, पुष्पवृष्टी अशा विविध रुपातील अभिषेक होत आहेत. स्वस्तिश्री चारुकिर्ती भट्टारक स्वामी यांच्या नेतृत्वाखाली व आचार्य वर्धमानसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत असल्याचे समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील यांनी सांगितले. 

मंदिराची 9 दिवसांची दिनचर्या महोत्सव सोहळा...

सकाळी 6 वाजता मंदिर खुले, स. 6 ते 8 नंतर दर्शन, 8 ते दुपारी 2.30 महामस्तकासाठी निमंत्रित भाविकांना प्रवेश, 2.30 ते 8 पर्यंत सर्वांसाठी खुले, रात्री 8 ते 9 पर्यंत मंदिर परिसराची पाहणी, रात्री 10 वाजता मंदिर बंद होणार, असा 9 दिवसांचा सोहळा.

अभिषेकाची संधी...

तीन महिन्यापूर्वीच निमंत्रित अभिषेक बोलीचे नियोजन, पहिल्या अभिषेकाचा मान सुरेश पटणी (किशन गट राजस्थान) यांना मिळाला, 11 कोटी 61 लाख रुपयांची बोली, सर्वसाधारण 5 हजार 100 रुपयांची देणगी यावर्षी विदेशातून कलश आले आहेत. त्यांच्याही उपस्थितीत अभिषेक होतो आहे.

त्यागी निवास...

200 त्यागी, 100 माताजींचे वास्तव्य, महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी 4 मोठ्या आचार्य संघासह 200 जैन मुली, 100  माताजी वास्तव्यास आहेत. त्यांच्यासह सेवकांसाठी तात्पुरती घरांची उभारणी केली आहे. आहारासाठी 114 चौके, 2 मंदिरे व आयुर्वेदिक दवाखाना, प्रवचनासाठी 1 लाख चौरस फुटाचा चामुंडराय सभा मंडप अशी व्यवस्था आहे. या सोहळ्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. सन्मती संस्कार, वीर सेवा दल, चंदाबाबा ग्रुप, भारत स्काऊट गाईड अशा अन्य संघटनांच्या संघटकांची स्वतंत्र राहण्याची, भोजनाची व्यवस्था केली आहे. महोत्सव समितीच्या अध्यक्षा सरिता जैन यांच्यासह पदाधिकारी संयोजन करीत आहेत.