Thu, Jun 20, 2019 20:42होमपेज › Sangli › रूग्णालयाचा भोंगळ कारभार; सांगलीतही चिमुकल्याच्या हाती सलाईन 

रूग्णालयाचा भोंगळ कारभार; सांगलीतही चिमुकल्याच्या हाती सलाईन 

Published On: May 19 2018 11:00AM | Last Updated: May 19 2018 11:00AMसांगली : पुढारी ऑनलाईन 

सरकारी रूग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. सांगलीच्या सिव्हील रूग्णालयात एका ४ ते ५ वर्षाच्या चिमुकल्याला आपल्या आईजवळ सलाईन हातात धरून उभे रहायला लागले आहे. हा प्रकार 45 मिनिटे सुरू होता. तरी कोणीही याची दखल देखील घेतली नाही. 

शुक्रवारी (१८ मे) रोजी कौटुंबिक वादातून एका महिलेला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित महिलेला दुपारी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले. रूग्णालयात गर्दी असल्याने महिलेला जनरल वॉर्डच्या बाहेरच थांबवण्यात आले. तपासणी करून तिथेच तिला सलाईन लावण्यात आले. त्या महिलेच्या शेजारी असलेल्या ५ वर्षाच्या चिमुकल्याला सलाईन पकडण्यास सांगण्यात आले. संबंधित मुलगाही सुमारे पाऊन तास सलाईन हातात घेऊन उभा होता. विशेष म्हणजे सलाईनची बाटली बर्‍याच वेळापासून हातात धरून उभा असलेल्या चिमुकल्याची अवस्था वॉर्डातील डॉक्टर, कर्मचारी पाहत होते; परंतु कुणालाही त्याची दया आली नाही. अखेर काही लोकांनी याची विचारणा केल्यावर रूग्णालय प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी महिलेले वॉर्डमध्ये शिफ्ट केले. 

वाचा : रुग्णालयात मुलीचा सलाईन स्टॅण्डसारखा वापर! 

काही दिवसांपूर्वीच औरंगाबादच्या सरकारी रूग्णालयात सलाईन स्टँड नसल्याने वडिलांसाठी एका चिमुकलीला सलाईन हातात धरून उभे रहायला लागले होते. असाच प्रकार सांगलीत घडल्याने सरकारी रूग्णालयात जायचे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाल्यास आश्चर्य वाटायला नको. रूग्णालयात योग्य त्या सोई सुविधा नसतील तर प्रशासनाने त्या उपलब्ध करून दिल्या पाहीजे. पण, सरकारी रूग्णालयातील डॉक्टर रुग्णांना त्यांच्या वाऱ्यावर सोडून जात असल्याच चित्र औरंगाबाद आणि सांगलीत दिसून आले आहे.  

सांगली सिव्हीलमधील हा फोटो व्हायरल झाल्याने रूग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

Image may contain: 1 person, smiling, indoor

Image may contain: 1 person, sitting and indoor

Image may contain: 2 people, people sitting and indoor

Image may contain: 2 people, people sitting and indoor