Fri, Apr 19, 2019 07:59होमपेज › Sangli › शिवसेनेच्या 29 उमेदवारांची माघार 

शिवसेनेच्या 29 उमेदवारांची माघार 

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 16 2018 12:07AMआटपाडी : प्रतिनिधी 

आटपाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी शिवसेनेच्या 32 पैकी 29 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. बुधवारी  अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. येथे  सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या  बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाला होता.शिवसेना नेते तानाजी  पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत  सरपंच पदासाठीचे पाचपैकी चार  आणि सदस्य पदासाठीचे 27 पैकी 2 अर्ज मागे घेतले. त्यामुळे या निवडणुकीसाठी आता फक्त भाजपचे अर्ज शिल्लक राहिले आहेत.

दरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतील निर्णयाशी सहमत असल्याचे सांगितले होते.परंतु आज दुपारी झालेल्या युवा कार्यकर्त्यांच्या बैठकीत मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी,जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे,पंचायत समिती सदस्य रुपेश पाटील,ऋषिकेश देशमुख यांनी अमरसिंह देशमुख सोमवारी झालेल्या बैठकीतील सर्वपक्षीय नेत्यांच्या भूमिकेशी सहमत आहेत. परंतु  कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे  निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.