Sat, Sep 22, 2018 17:09होमपेज › Sangli › महापालिका निवडणूक ताकदीने लढा

महापालिका निवडणूक ताकदीने लढा

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 11:40PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणूक ताकतीने लढा, असे आदेश शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हातील पदाधिकार्‍यांना मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. महापालिका निवडणुकीसंदर्भात आज मुंबईत बैठक झाली. त्यावेळी  खासदार गजानन किर्तीकर, संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे- पाटील, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, नगरसेवक शेखर माने, गौतम पवार, शंभूराज काटकर, मयूर घोडके  आदि  उपस्थित होते. 

ठाकरे यांनी  महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील पक्षाच्या कामाचा आढावा घेतला. खासदार किर्तीकर आणि प्रा. बानुगडे पाटील यांनी कामकाजाची माहिती दिली. त्यानंतर ठाकरे  म्हणाले, निवडणुकीत कोणतीही कुचराई करू नका. पक्षाकडून तुम्हाला सर्व ती ताकद देण्यात येईल. एक दिलाने तयारी करा. कोणत्याही स्थितीत आपला पक्ष सत्तेवर आला पाहिजे.