Tue, Apr 23, 2019 06:42होमपेज › Sangli › मिरजेत शिवजयंतीनिमित्त मिरवणूक 

मिरजेत शिवजयंतीनिमित्त मिरवणूक 

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:32PMमिरज : शहर प्रतिनिधी 

 मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती यांच्यातर्फे मिरवणूक काढण्यात आली. शहरात शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करून विविध उपक्रम राबवण्यात आले.

दोन दिवसात कोल्हापूरचे डॉ. राजू चव्हाण यांचा बहुजन महामानवांच्या सत्य जीवनावर आधारित पोवाड्याचा कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार झाला. ‘ जिजाऊ  व आजची स्त्री’,  ‘महात्मा बसवेश्‍वर ते छत्रपती शिवाजी’, ‘महाराष्ट्र व आजची तरुण पिढी’ या विषयावर व्याख्यान झाली. आज आमदार सुरेश खाडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत बारा बलुतेदार, सजीव घोडेस्वार, अवधूत आखाडा कोल्हापूर यांचा शिवकालीन मर्दानी खेळ, हलगी वादन, लेझीम पथक या मिरवणुकीत होते. उत्सव समितीचे अध्यक्ष विलास देसाई, काँग्रेसचे धनराज सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद इनामदार, धनंजय भिसे, अनिकेत परब, इरफान बारगीर, रघुवीर चव्हाण, अमृत सूर्यवंशी, अशोक पाटील, विजय पाटील, चंद्रकांत शिंदे, विशाल लिपाणे, करण जामदार, मदन तांबडे, विक्रम देसाई, जैलाब शेख, प्रकाश पवार, गीतांजली देसाई, नीना देसाई आदींसह अनेकजण सहभागी झाले होते.