Wed, Nov 14, 2018 10:04होमपेज › Sangli › राजू शेट्टींच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार

राजू शेट्टींच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार

Published On: Apr 15 2018 1:31PM | Last Updated: Apr 15 2018 1:31PMसांगली : पुढारी ऑनलाईन

खासदार राजू शेट्टी यांचा काँग्रेसकडे कल वाढला आहे. त्यांची सोनिया गांधींशीही भेट झाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी आम्‍ही जागा सोडली होती. परंतु, आता शिवसेना हातकणंगले मतदार संघातून शेट्टींच्या विरोधात उमेदवार देणार आहे, असे शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी सांगितले. 

सांगली येथे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा होत आहे. यावेळी कीर्तिकर बोलत होते. नुकतेच संसद चालू दिली नाही म्‍हणून भाजपने केलेले उपोषण हा केवळ भंपकपणा आहे. विरोधी पक्षांनी वेगळी भूमिका घेतल्यावर पंतप्रधानांना तोडगा काढावा लागतो. परंतु, पंतप्रधान आपली भूमिका पार पाडत नाहीत, असे टीकास्‍त्र कीर्तिकर यांनी पंतप्रधान मोदींवर सोडले.

भाजप पैसा टाकून माणसं विकत घेतो

यावेळी बोलताना गजानन कीर्तिकर यांनी भाजप पैसे टाकून माणसं विकत घेत असल्याचा आरोप केला. तसेच चंद्रकांत पाटील हे पैशाचा पाऊस पाडतात. त्यामुळे त्यांची ताकद दिसते. पण ती ताकद तात्‍पुरती असते. मोदींची घसरण सुरू असून खरेदी केलेले नेतेही परत जातील, असे कीर्तिकर म्‍हणाले. 

वाचा : भाजप नेत्यांच्या अभिवादनानंतर दुधाने धुतला आंबेडकरांचा पुतळा

वाचा : ‘भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना येथे प्रवेश नाही’

Tags : shivsena, raju shetty, loksabha, gajanan kirtikar,