Thu, Jul 18, 2019 16:35होमपेज › Sangli › करगणी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

करगणी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 29 2018 7:13PMआटपाडी  : प्रतिनिधी 

करगणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा धुव्वा उडवित भगवा फडकावला.शिवसेनेच्या गणेश लक्ष्मण खंदारे यांनी भाजपच्या निलेश चंद्रकांत कांबळे यांचा 847 मतांनी पराभव केला. जिल्हापरिषद निवडणुकीत या गटात झालेल्या पराभवाची ग्रामपंचायत निवडणुकीत तानाजी पाटील यांनी परतफेड केली.ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेने रासपच्या सहकार्याने 17 पैकी 11जागा आणि सरपंचपदाची निवडणूक जिंकत मोठा विजय मिळविला.भाजपचे सहा सदस्य निवडून आले.सरपंचपदासाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते.परंतु खरी लढत शिवसेना आणि भाजप मध्ये झाली.सेनेच्या गणेश खंदारे यांना 3117 मते तर भाजपच्या निलेश कांबळे यांना 2270 मते मिळाली.

करगणी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या मनीषा पाटील यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. त्या पार्श्‍वभुमीवर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीची लढत झाली. तानाजी पाटील, जेष्ठ नेते अण्णासाहेब पतकी, विजयसिंह सरगर,भीमराव व्हनमाने,रासपचे लक्ष्मण सरगर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत बाजी मारली आणि पराभवाची परतफेड केली. निकालानंतर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढली.आमदार अनिल बाबर आणि तानाजी पाटील यांनी विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार केला.नुतन सरपंच  खंदारे यांनी आमदार बाबर व तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाला गती देण्याची ग्वाही दिली. विजयी सदस्य-गोविंद खिलारी, ब्रम्हदेव खिलारी, सारिका माने, अण्णासो सरगर, लक्ष्मण खिलारी, छाया मंडले, अशोक सरगर, दिपाली पाटील, प्रियांका सरगर,रमेश लांडगे, कांचन जगदाळे,अंबुताई  माने, जब्बार मुल्ला, रेश्मा सवणे, गुलशन इनामदार, तुकाराम जानकर,चतुरा थोरात.