होमपेज › Sangli › भ्रष्ट कारभार करणार्‍यांना सत्तेवरून बाजूला करा

भ्रष्ट कारभार करणार्‍यांना सत्तेवरून बाजूला करा

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 11:13PMसांगली : प्रतिनिधी

सांगलीच्या नेत्यांनी आतापर्यंत  विकास करण्याऐवजी जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा उद्योग केला आहे. भ्रष्ट कारभार करणार्‍यांना सत्तेवरून बाजूला करा,  असे आवाहन शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी केले. महापालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी  आयोजित सभेत ते बोलत होते.  जिल्हा प्रमुख संजय विभूते, आनंदराव पाटील, नगरसेवक शेखर माने यांच्यासह प्रभागातील उमेदवार यावेळी उपस्थित होते.  

बानुगडे-पाटील म्हणाले, पुण्या मुंबई सारखी शहरे वेगाने प्रगतीच्या अंगाने झेपावत असताना सांगली मात्र का मागे राहिली याचे चिंतन-मंथन झाल पाहिजे. आमची मुल शिकतात आणि पुण्यामुंबईला नोकरीसाठी जातात. सांगलीत एवढी मोठी बाजारपेठ असताना आपली मुले इतर शहरांमध्ये का जातात. त्यांना पुरेसा एवढा रोजगार आपण का निर्माण करू शकत नाही?   

प्रत्येक निवडणूक पाण्यावर लढली गेली परंतु जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याशिवाय नेत्यांनी काहीही केले नाही.  सर्वसमान्य जनतेला पायाभूत सुविधा देणे हे महापालिकेचे प्रथम कर्तव्य आहे. तुम्ही कर भरता. वर्षाला 700 कोटींच बजेट आहे. मग पाच वर्षाुत 3 हजार 500 कोटींची कामे झाली पाहिजेत. ती झाली का़?झाली नसतील तर आपण नेत्यांना याचा जाब विचारला पाहिजे. पाचशे पाचशे कोटींचा दरवर्षा भ्रष्टाचार होतो आणि आपण गप्प कसे बसतो. नेते शाही थाटात जगतात गरीब माणसं मात्र रस्त्यावरच फिरतात. हा शाही जगण्याचा अधिकार आपण सर्वांनाच दिला पाहिजे आणि यासाठी शिवसेनेच्या जाणत्या उमेदवारांना निवडून द्या.   इथे विकासाचा सूर्योदय होईल.