Mon, Sep 24, 2018 01:24



होमपेज › Sangli › शिवसंस्कार शिल्पाचे उद्या अनावरण

शिवसंस्कार शिल्पाचे उद्या अनावरण

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 8:01PM



सांगली : प्रतिनिधी

सांगलीतील बच्चू हलवाई फौंडेशनतर्फे रविवारी ( दि. 24 ) शिवसंस्कार शिल्पाचे अनावरण करण्यात येणारआहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड व ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, शांतीनिकेतनचे संचालक गौतम पाटील, वास्तुविशारद प्रमोद चौगुले, मराठा मेळाचे अध्यक्ष विजयकुमार भोसले प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या वेळी कोकाटे यांचे ‘शिवसंस्कार’ हे  व्याख्यान होणार आहे, अशी माहिती फौंडेशनतर्फेचे पदाधिकारी ए. डी. पाटील, काका हलवाई, सुधीर सावंत, संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले,  शहाजीराजे यांनी  जिजाऊंना  स्वराज्याची संकल्पना सुचविली.  जिजाऊ यांनी तीच शिकवण शिवरायांना दिली. यातूनच स्वराज्य निर्मिती झाली,  हाच इतिहास  या शिल्पातून मांडला आहे. हा कार्यक्रम सांगली-मिरज रोडवरील शिव पॅव्हेलियनमधील पत्रकार भवनमध्ये सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वसंत  देवकर, रोहित  हलवाई, खंडेराव हलवाई यांनी केलेआहे.