Wed, Feb 26, 2020 08:42होमपेज › Sangli › निखिल खाडेकडून सांगलीतही फसवणूक

निखिल खाडेकडून सांगलीतही फसवणूक

Published On: Dec 16 2017 1:47AM | Last Updated: Dec 16 2017 1:47AM

बुकमार्क करा

शिरोळ : प्रतिनिधी 

येथील राजाराम माने आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी निखिल खाडे याने कोल्हापूरसह सांगली शहरातही पोलिस भरती करतो असे सांगून दोन महिलांची फसवणुक केली आहे. या संदर्भात शुक्रवारी संबधित महिलांनी शिरोळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. हा गुन्हा सांगली शहरात घडल्याने त्याच जिल्ह्यात या फसवणुकीची नोंद होणार असल्याची माहिती शिरोळ पोलिसांनी दिली.  दरम्यान, अटकेत असलेल्या चौघा संशयित आरोपींची शनिवारी पोलिस कोठडीची मुदत संपणार असल्याने त्यांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केले जाणार आहे  या प्रकरणातील पाचवा संशयीत शिंदे नामक पोलिस अधिकारी याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी कसोशिने प्रयत्न सुरू केले आहेत. गुन्ह्यातील मास्टरमाईंड खाडे याने पोलिस तपासाला सहकार्य करीत स्वतः गुन्ह्याची कबुली दिली आहे.

 संशयीत खाडे हा पोलिसांना देत असलेल्या माहितीचे घटनेशी साम्य आहे. संशयीत आरोपी निलंबीत पो.कॉ. भुजिंगा कांबळे व खाडे याचे घनिष्ठ संबंध होते. खाडे हा बहुंताश वेळी पोलिसांच्या संपर्कात होता. मयत माने प्रकरणात महिलेला पुढे करून आर्थिक व मानसिक छळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयित मोबाईल फोनवरून महिला आरोपी स्वाती माने हिने खाडे याच्या सांगण्यावरून मयत माने याच्याशी संभाषण केल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत सखोल चौकशी होऊन योग्य तो पोलिस तपास व्हावा. जयसिंगपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे सक्तीच्या रजेवर आहेत. रजा मंजुरीचा पहिल्या दिवशी कार्यालयातच वाढदिवस साजरा केला आहे या प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन आ. उल्हास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे .