Thu, Jan 17, 2019 20:52होमपेज › Sangli › शेतकर्‍यांशी संवाद साधला पाहिजे

शेतकर्‍यांशी संवाद साधला पाहिजे

Published On: Jan 21 2018 2:54AM | Last Updated: Jan 21 2018 12:12AMशिराळा :प्रतिनिधी

समाजात आज मूल्ये चिरडली जात आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्याला वाचवायचे असेल तर त्याच्याशी संवाद साधला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत लेखक प्रा. राजन गवस यांनी केले. येथे यशवंत व्याख्यानमालेत  ते बोलत होते.  शिराळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे अध्यक्षस्थानी होते. आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित नाईक, सुनंदा नाईक, राजेश्‍वरी नाईक, सुखदेव पाटील, अभिजित नाईक उपस्थित होते. यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी प्रास्ताविक केले. 

प्रा. गवस म्हणाले की, माणसा माणसात संवाद साधला पाहिजे. तरच शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील. सज्जनाला जगावयास जागा नाही. मुलांचे प्राथमिक शिक्षण हे मराठीतून व्हावे. मुलांची विचार करण्याची शक्ती मातृभाषेतून विकसित होत असते. विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर चांगल्याच कामासाठी झाला पाहिजे. परंतु त्याचा बागुलबुवा होत आहे. गरीब व श्रीमंतांमधील दरी वाढत चालली आहे. गरीबांना सुखाने जगू देत नाही राबणारी माणसे कमी होत आहेत. संजय घोडे- पाटील यांनी सूत्रसंचलन केले. सतीश पाटील, अ‍ॅड. बाबालाल मुजावर, बी. सी. पाटील, सीमा कदम, उत्तम निकम, प्रकाश पाटील, दिलीप कदम, बी. एस. पाटील  उपस्थित होते