Wed, Jan 16, 2019 20:08होमपेज › Sangli › शिंदे दाम्पत्याची अटकपूर्वसाठी धाव

शिंदे दाम्पत्याची अटकपूर्वसाठी धाव

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 8:15PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

शहरातील आपटा पोलिस चौकी परिसरात असणार्‍या राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राचा चालक राज शिंदे व त्याची पत्नी विजया यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर दोन दिवसात सुनावणी होणार आहे. शिंदे दाम्पत्य गेल्या 16 दिवसांपासून गायब आहे. त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. 

दि. 12 रोजी शिंदे दाम्पत्यासह तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची दोन पथके शोध घेत आहेत. मात्र दोघेही गायबच आहेत. फसवणुकीची घटना उघडकीस आल्यानंतर उत्तर शिवाजीनगर येथील नागरिकांनी त्याच्या मुलाला केंद्राचे कार्यालय बंद पाडण्यास भाग पाडले होते. संतप्त नागरिकांनी कार्यालयाला टाळेही ठोकले होते. 

राज शिंदेने आलिशान वधू-वर सूचक केंद्र सांगलीतील उत्तरशिवाजीनगर येथे सुरू केले होते. तेथे कार्यालयात काम करणार्‍या मुली स्थळ म्हणून दाखविल्या जात होत्या. स्थळाचा संपर्क क्रमांक आणि पत्ते देण्यासाठी इच्छुक वरांकडून तसेच पालकांकडून पैसे उकळले जात होते. याप्रकरणी पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याने औरंगाबाद, नांदेड येथेही अशी केंद्रे सुरू केली असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस त्या परिसरात त्याचा शोध घेत आहेत. त्याचे वडील आणि भावाकडेही चौकशी करण्यात आली आहे.