Thu, Apr 25, 2019 11:30होमपेज › Sangli › शेतीमालाच्या हमीभावासाठी शेट्टींचे राष्ट्रपतींना साकडे

शेतीमालाच्या हमीभावासाठी शेट्टींचे राष्ट्रपतींना साकडे

Published On: Jun 01 2018 2:13AM | Last Updated: May 31 2018 9:54PMसांगली : प्रतिनिधी

शेतीमालाच्या हमीभावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी  राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांना साकडे घातले. हजारो ग्रामपंचायतींचे ठराव त्यांच्याकडे सुपूर्त केले. शेती प्रश्‍नांसाठी संसदेचे  विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी त्यांनी केली. 

संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड. योगेश पांडे व अनिल पवार यांनी सांगितले की, देशात शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहेत. त्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे.शेतकर्‍यांच्या समस्येवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे. त्यासाठी करोडो शेतकर्‍यांनी दि. 10 मे रोजी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. तसेच 1 मेरोजी  हजारो ग्रामपंचायतींनी  ग्रामसभेचा ठराव देखील केला आहे. शेट्टी यांनी अखिल भारतीय किसान कमिटीच्यावतीने राष्ट्रपतींची भेट घेतली. ते ठराव त्यांच्याकडे दिले असल्याचे सांगण्यात आले.