होमपेज › Sangli › ‘चला नाती जपूया...’ : अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे सांगलीत व्याख्यान

‘चला नाती जपूया...’ : अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे सांगलीत व्याख्यान

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 24 2018 8:27PMसांगली : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे ज्येष्ठ समाजप्रबोधनकार आणि प्रसिद्ध वक्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘चला नाती जपूया... ’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. दि.  27 मार्च रोजी, दुपारी 2.30 वाजता कच्ची जैन भवन, राममंदिर कॉर्नर सांगली येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य प्रायोजक म्हणून अरविंद देवपूजा तसेच सह प्रायोजक म्हणून विज्ञान माने हे लाभले आहेत.

दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे सभासद महिलांसाठी विविध उपक्रम नेहमीच राबवले जातात. त्यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, व्यक्‍तिमत्त्व विकास, उद्यमशीलता विकास आणि समाज प्रबोधनपर असे उपक्रम असतात. यातीलच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अ‍ॅड. रामतीर्थकर या अवघ्या महाराष्ट्रात अतिशय प्रभावी अशा वक्त्या म्हणून ख्यातनाम आहेत. त्यांनी महाराष्ट्रात शेकडो व्याख्याने दिली आहेत. भारतीय परंपरा, संस्कृती यांचा सन्मान केला पाहिजे. आपली प्राचीन काळापासूनची कुटुंबपद्धती टिकवून ठेवली पाहिजे. कुटुंबातील आणि कुटुंबाबाहेरचीही जिव्हाळ्याची नाती जपली पाहिजेत. 

समाजात आज कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक पातळ्यांवरील  असंख्य समस्या उभ्या आहेत. त्या समस्यांना सामोरे कसे जायचे. अशा वेळी या समस्यांचे मूळ कुठे आहे ते अ‍ॅड. रामतीर्थकर अतिशय ओघवत्या शब्दांत स्पष्ट करून सांगतात. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या सभासद महिलांना ही सुवर्णसंधी आहे. त्यासाठी  महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब, सांगली यांच्या वतीने करण्यात आले 
आहे. 

प्रवेश मर्यादित असून आपली जागा आरक्षित करण्यासाठी संपर्क :
पुढारी भवन, जिल्हा परिषदेसमोर, सांगली-मिरज रोड, सांगली.
संयोजिका : गीतांजली पाटील 
मो. : 8805007176

Tags : Sangli,Sangli News, Senior social activist, famous speaker, Adv. Aparna Ramtirthkar, lecture, Daily Pudhari, Kasturi Club