Tue, Apr 23, 2019 19:34होमपेज › Sangli › ज्येष्ठ कामगार नेते बिराज साळुंखे यांचे निधन

ज्येष्ठ कामगार नेते बिराज साळुंखे यांचे निधन

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 12:04AMसांगली : प्रतिनिधी

एस.टी. कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते बिराज साळुंखे (वय 80) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. त्यांचे थोरले जावई यांनी अग्‍नी दिला. संयुक्‍त महाराष्ट्राची चळवळ, बेळगाव सीमाप्रश्‍नी आंदोलनासह आणीबाणी विरोधातील  आंदोलनातही ते आघाडीवर होते. एस.टी. कामगार, कष्टकरी, दलित, अंगणवाडी कर्मचारी, मोलकरणी, काचपत्रा गोळा करणारे यांच्यासाठीच्या  चळवळींचे नेतृत्व करीत आयुष्यभर समाजवादी विचारांचा वारसा त्यांनी  जोपासला. त्यांना मेंदूच्या आजारामुळे मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव  एस. टी. च्या विभागीय कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले.  तिथे सांगली विभाग नियंत्रक अमृता ताम्हनकर, विभागीय वाहतूक अधिकारी पोपटराव कदम, कामगार अधिकारी डांगरे, लेखाधिकारी फारणे तसेच एस. टी. कामगार व अनेक मान्यवरांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. तेथून त्यांची  अंत्ययात्रा निघाली. ‘बिराज साळुंखे अमर रहे’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. अमरधाम स्मशानभूमीत विविध मान्यवरांच्या अलोट गर्दीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन शुक्रवारी (दि. 6) सकाळी 10 वाजता होणार आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, जावई, नात असा परिवार आहे. 

मान्यवरांची उपस्थिती

अमरधाम स्मशानभूमीत  आदरांजली वाहण्यात आली.  कामगार आणि कष्टकर्‍यांसाठी अहोरात्र झटणारा निस्वार्थी नेता हरपला अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्‍त केल्या. महापौर हारुण शिकलगार, माजी आमदार प्रा. शरद पाटील, अ‍ॅड. के. डी. शिंदे, एस. टी. कामगार नेते हनुमंत ताटे, हसन देसाई, अंगणवाडी संघटनेच्या रेखा पाटील, विद्या स्वामी, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, ज्येष्ठ नेते धो. ल. थोरात, शिवसेनेचे बजरंग पाटील, शंभू काटकर, हमाल पंचायतीचे विकास मगदूम, कॉ. शंकर पुजारी, कॉ. उमेश देशमुख, ज्येष्ठ कामगार नेते एम. बी. पठाण, ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबुराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, विलास यादव आदींनी मनोगत व्यक्‍त करून आदरांजली वाहिली. 

यावेळी मनसेचे नितीन शिंदे, उपमहापौर विजय घाडगे, संभाजी ब्रिगेडचे संजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब पुजारी, रावसाहेब माणकापुरे, कॉ.तानाजी पाटील,  सदाशिव मगदूम, प्रा. अमर पांडे, प्रा. रविंद्र ढाले, सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, तसेच एस. टी. बँकेचे नारायण सूर्यवंशी, शमू मुल्ला, दिलीप चौगुले, विजय पवार, अरुण जाधव, दीपक पवार, दत्ता माळी, प्रवीण देशमुख, सतीश मेटकरी, अंकूश माने, संजय शिंदे, अजित भोसले, विलास चव्हाण, एन. डी. सावंत, धनंजय पाटील आदीसह एस. टी. संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.