Sun, May 26, 2019 21:46होमपेज › Sangli › तेहतीस लाखांचा डिझेल साठा जप्त

तेहतीस लाखांचा डिझेल साठा जप्त

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 24 2018 11:36PMकुपवाड : वार्ताहर 

 मिरज एमआयडीसीसमोरच्या दुर्गानगर झोपडपट्टीजवळील गुलमोहर  कॉलनीत 33 लाखांच्या  बेकायदेशीर डिझेल साठ्यावर कुपवाडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. या घटनेची कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली असून दोन संशयितांना अटक केली आहे. 

अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये सुरेश कृष्णा गायकवाड (वय 42, रा. गुलमोहर कॉलनी, मिरज), सुनील वसंत जाधव (वय 40, रा. मिरज) यांचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिरज एमआयडीसीसमोरच्या दुर्गानगर झोपडपट्टीजवळील गुलमोहर कॉलनीत संशयित सुरेश गायकवाड यांच्या मालकीचे तीन टँकर इंडियन ऑईल कंपनीकडे डिझेल वाहतुकीसाठी कार्यरत आहेत. या टँकरमधून मालक गायकवाड हा डिझेल वारंवार काढून घेऊन बेकायदेशीरपणे विक्री करीत असल्याची माहिती मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.धीरज पाटील यांना मिळाली. त्यानुसार डॉ. पाटील यांनी तातडीने कुपवाड पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला घटनास्थळी जाण्यासाठी आदेश दिले. त्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक अशोक कदम, हवालदार प्रवीण यादव, विश्वास वाघ,रमेश जाधव, कृष्णा गोजारी यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.या छाप्यावेळी टॅकर मालक गायकवाड हा त्याचा साथीदार सुनिल जाधव यांच्या मदतीने टॅकरमधून(एम.एच.-10 ए.क्यू --6327) डिझेल काढत असताना रंगेहाथ सापडला.

या कारवाईत पोलिसांना  टँकरमध्ये ठेवलेले वीस हजार लिटर व घरात ठेवलेले एक हजार लिटर असे एकूण एकवीस हजार लिटर बेकायदेशीरपणे साठा केलेले डिझेल  मिळून आले. पोलिसांनी डिझेल टँकरसह सुमारे 33 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

Tags : sangli, Miraj, diesel stocks, Seized, sangli news,