Sat, Jul 20, 2019 10:46होमपेज › Sangli › उसाचा 400 चा हप्ता तातडीने द्यावा

उसाचा 400 चा हप्ता तातडीने द्यावा

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 9:13PMसांगली : प्रतिनिधी

पहिल्या उचलीतील उसाचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा, अन्यथा कारखान्यांतील साखर अडवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.  प्रसिध्दी पत्रकात संघटनेने म्हटले आहे की, हंगाम सुरू होताना साखरेचे भाव चांगले होते. त्यामुळे कारखानदारांनी तीन हजार रुपयांचा हप्ता दिला. पण नंतरच्या काळात साखर दर पडल्याचे कारण पुढे करुन कारखानदारांनी एक होऊन शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या पहिल्या हप्त्यात 400 रुपयांची कपात केली. हे सरळसरळ चुकीचे आहे.

कारखान्यांना साखरेव्यतिरिक्त मळी, बगॅस, विविध अ‍ॅसिड, को-जनरेशन यातून मोठा नफा मिळतो. तसेच कारखानदार काटामारी करुन व साखर उतारा चोरुन लूट करुन कोट्यवधींचा घपला करतात. काही कारखानदार बनावट कंपन्याव्दारे साखर विक्री करतात. शेतकर्‍यांच्या घामाला योग्य दाम द्यायचे म्हटले की मात्र त्यांच्या पोटात गोळा उठतो अशी टीका करण्यात आली आहे.  पत्रकावर कार्याध्यक्ष सयाजी मोरे, प्रवक्ते महेश खराडे, उपाध्यक्ष महावीर पाटील,  जयकुमार कोले, भागवत जाधव, संजय बेले, राम पाटील, सनी गडगे, अभिजित पाटील, भारत साजणे, दशरथ पाटील, संदीप चौगुले, विकास देशमुख, संदीप राजोबा यांच्यासह कार्यकर्त्यांची नावे आहेत.