Mon, Mar 25, 2019 03:28
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › सांगलीत मनपाची शाळा झाली ‘हॅपी स्कूल’

सांगलीत मनपाची शाळा झाली ‘हॅपी स्कूल’

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 05 2018 11:39PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका शाळा म्हटले की मोडकी दारे, खिडक्या तुटलेल्या, स्वच्छतागृहाची दुरवस्था, पटसंख्या कमी, शैक्षणिक सुविधांचा अभाव असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पण हे चित्र बदलले आणि शामरावनगरात शाळा क्रमांक 11 चा अभूतपूर्व कायापालट झाला आहे. लोकसहभागातून डिजिटल क्‍लासरूम, अत्याधुनिक शिक्षण आणि सुसज्ज शिक्षणव्यवस्था उभारण्यात आली आहे. अशा पद्धतीने या शाळेचे नावही हॅपी स्कूल असे करण्यात आले आहे. 

महापालिकेच्या  60 हून अधिक शाळांची अवस्था दयनीय आहे. पटसंख्येचा घसारा, सुविधांचा अभाव आणि शिक्षणव्यवस्थेबाबतची उदासीनता असे चित्र आहे. याला ही शाळाही काही वर्षे अपवाद नव्हती. 
सन 1923 पासून ही शाळा मारुती चौकात संस्थानच्या जागेत होती. याच शाळेत गानसम्राज्ञी लता मंगेशकर आदींसह अनेकजण शिकले. पण महापालिकेत बीओटीची संकल्पना आली आणि  2000 पासून ही शाळा पटसंख्या घसरल्यामुळे  शामरावनगरात आली. 

त्यावेळी सर्व वगार्ंची पटसंख्या अवघा 20 होती.  पण गेल्या तीन-चार वर्षांपासून लोकसहभागातून हळूहळू बदल होऊ लागला. त्यानुसार पहिल्यांदाच महापालिकेच्या एका शाळेचे  डिजिटल शाळा असे नामकरण करण्यात आले. सर्व शिक्षण संगणकावर देण्यास सुरुवात केली. या सर्व शैक्षणिक प्रगतीत शाळेच्या मुख्याध्यापिका नीता चिंडगे आणि शिक्षक गजानन  मोरलवार यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी पदरमोड केली. क्रमाक्रमाने शाळेचे रुप बदलत गेले. आता रोटरी क्लब ऑफ  मिडटाऊनने पुढाकार घेऊन शाळेचे रुपांतर ‘हॅपी स्कूल’मध्ये केले आहे. गवत व कचरा हटवून  तारेचे कंपाऊंड, प्रशस्त गेट, शुद्ध पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह अशी सोय केली आहे. संपूर्ण शाळेच्या इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली आहे.  

रोटरीच्यावतीने लोकसहभागातून अडीच लाख रुपये या शाळेसाठी गोळा करुन दिले. आता शाळेतील बालवाडी ते सातवीपर्यंतच्या मुला-मुलींना इ-लर्निगद्वारे अभ्यासक्रम शिकवला जातो. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ज्या पध्दतीने शिक्षण दिले जाते, त्या प्रमाणे मनपाच्या शाळेत शिक्षण दिले जाते.  पटसंख्याही आता 60 वर गेली आहे.या हॅपी स्कूल व  लर्निंग क्लासरुम उद्घाटन रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आनंद कुलकर्णी यांनी केले.  शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी  हणमंत बिराजदार, असिस्टंट गव्हर्नर विजय बजाज, रोटरीचे अध्यक्ष जयराज सगरे,  मोहन पाटील, श्रीकांत भोई , सतीश कांबळे, केंद्र समन्वयक जाधव, घोलप, राहुल होनमोरे , रवींद्र शिंदे आदी उपस्थित होते. 

Tags : Sangli, School,  Sangli municipal corporation,  turned,  Happy School