Fri, Nov 16, 2018 02:27होमपेज › Sangli › शाळकरी मुलगी बुडाली

शाळकरी मुलगी बुडाली

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 22 2018 12:07AMलिंगनूर : वार्ताहर

म्हैसाळ योजनेच्या लांडगेवाडी (आरग परिसर) येथील चौथ्या टप्प्यातील जलाशयात एक मुलगी शनिवारी दुपारी तीन वाजता पाय धुताना बुडाली. गौरी शंकर चव्हाण (वय 9, आरग) असे तिचे नाव आहे. तिच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी नातेवाईक आणि चौथ्या टप्प्यातील अधिकारी, कर्मचारी यांची रात्री आठ वाजेपर्यंत धावपळ उडाली होती.

या घटनेमुळे चौथ्या टप्प्यातील तेरा विद्युत पंप सुरू केले आहेत. वेगाने पाणी उपसा करण्यात येत आहे. मृतदेह शोधकार्य जलद गतीने व्हावे यासाठी तिसरा टप्पा तूर्तास बंद करण्यात आला आहे. रात्री आठ वाजता 622 पर्यंत पाणीपातळी झाली होती. 

Tags : sangli,  Landgewadi, School girl, drowned, sangli news,