Tue, Nov 20, 2018 16:54होमपेज › Sangli › सातारा - कोल्हापूर पॅसेंजरचे इंजिन फेल; गाडीला २ तास उशिर

सातारा - कोल्हापूर पॅसेंजरचे इंजिन फेल; गाडीला २ तास उशिर 

Published On: Aug 16 2018 9:58AM | Last Updated: Aug 16 2018 9:58AMमिरज : प्रतिनिधी 

सातारा - कोल्हापूर  पॅसेंजरचे इंजिन गुरुवारी सकाळी सातारा स्थानकात फेल झाले. यामुळे पॅसेंजर सातारा स्थानकातून निघाली नाही. इंजिन फेल झाल्याचे मिरज कंट्रोलला समजताच सांगली स्थानकातील पर्यायी इंजिन साताराकडे रवाना करण्यात आले आहे. 

इंजिन फेल झाल्याने पॅसेंजरला २ तास उशिर होणार असल्याने  कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली. तसेच या विलंबामुळे कोल्हापूर स्थानकातून सकाळी ११ वाजता सुटणाऱ्या कोल्हापूर- मिरज पॅसेंजरचे वेळापत्रक कोलमडले आहे.

दरम्यान,  मिरज - बेळगांव रेल्वे मार्गावर घटप्रभा ते चिक्कोडी रोड स्थानका दरम्यान तांत्रिक कामाच्या दुरुस्तीमुळे तिरुपती - कोल्हापूर हरीप्रीया एक्स्प्रेस ७० मिनिटे तर लोंढा - मिरज पॅसेँजर ५० मिनिटे विलंबाने धावत आहे.