Wed, Jul 24, 2019 07:51होमपेज › Sangli › संजय पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद देणार

संजय पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद देणार

Published On: Jul 02 2018 1:48AM | Last Updated: Jul 02 2018 12:09AMतासगाव : प्रतिनिधी

खासदार संजय पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे. लवकरच त्यांना कॅबिनेट मंत्री करणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार संजय पाटील  यांचा सावळज येथे सत्कार करण्यात आला यावेळी ते  बोलत होते. ते म्हणाले, खासदार संजय पाटील लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पाणी प्रश्‍नावर त्यांचा अभ्यास आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले. सरकार महामंडळाला निधीची कमतरता भासून देणार नाही. 

खासदार संजय पाटील म्हणाले, सावळज परिसरातील पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी मिटावा, ही अनेक पिढ्यांची मागणी आहे. उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून आणि अधिकार्‍यांच्या सहकार्याने तो कायमस्वरुपी मिटवणार आहे. लवकरच टेंभूचे पाणी सिध्देवाडी तलावातून अंजनी तलावात सोडणार आहे. डोंगरसोनी भागाचा पाणी प्रश्‍नही मार्गी लावणार आहे.अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले म्हणाले, खासदार संजय पाटील हे योजनांची उर्वरीत कामे मार्गी लावतील. आतापर्यंत पाणी योजनांच्या माध्यमातून   हजारो  हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जून अखेरीस योजनेच्या लाभक्षेत्रात असलेले  लाख  हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामुळे दुष्काळी भागाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी मिटणार आहे. स्वागत सरपंच योगेश पाटील यांनी केले तर प्रास्तविक दिलीप देसाई यांनी केले. कार्यक्रमाला तासगावचे नगराध्यक्ष विजय सावंत, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे, पंचायत समिती सदस्य सुनील जाधव  अमोल माळी, संतोष आठवले, उमेश पाटील, वर्षा फडतरे,  महेश पाटील, सरपंच योगेश पाटील, उपसरपंच जयश्री कांबळे, अनिल थोरात,  बाबासाहेब पाटील उपस्थित होते.