Thu, Jul 18, 2019 16:33होमपेज › Sangli › सांगली : पूरग्रस्तांना मदत केल्याबद्दल  ट्विट करून  कौतूक

मुख्यमंत्र्यांकडून सांगलीकरांचे कौतूक 

Published On: Aug 23 2018 1:15PM | Last Updated: Aug 23 2018 1:15PMसांगली :  प्रतिनिधी

केरळमधील पूरग्रस्तांना सांगली जिल्ह्यातून तातडीने मदत पाठवण्यात आली. याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन ट्विटकरून सांगलीकरांचे आणि प्रशासनाचे कौतूक केले आहे. 

गेल्या आठवड्यात केरळ राज्याला  पूराचा मोठा फटका बसला.   अनेक लोक बेघर झाले आहेत. त्यांना मदतची गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी तिरुअनंतपूरम येथील जिल्हाधिकार्‍यांना संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी पहिल्या टप्यात पॅकिंग असलेले खाद्यपदार्थ देण्याचे आवाहन केले. 

वाचा : केरळ पूरग्रस्तांना सांगलीकरांची मदत 

जिल्हाधिकार्‍यांनी सोशल मिडियाव्दारे संदेश पाटवून लोकांना मदतीचे आवाहन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला. तहसिल कार्यालयातही व्यवस्था केली.  त्यांच्या आवाहानास प्रतिसाद देत  विविध उद्योग समूह, संघटना, पत्रकार, विद्यार्थी यांच्याकडूनही वस्तूच्या स्वरुपात मदत देण्यात आली.

खासदार संजय पाटील यांच्यासह अनेकांनी धनादेशाव्दारे मदत दिली. जमा झालेल्या सुमारे १४  टन वस्तू   अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी ट्रकमध्ये भरल्या. त्या पुणे   येथे पाठवून   तेथून रेल्वेने ही मदत केरळला पाठवण्यात आली. त्याशिवाय दुसर्‍या दिवशी आणखी दीड टन मदत पाठवण्यात आली. ही मदत देण्यासाठी दोन अधिकारी पुणे येथे गेले होते.  या सर्व उपक्रमाची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन जिल्हा प्रशासन आणि सांगलीकरांचे सोशल मीडियावर कौतूक केले.