Tue, Mar 19, 2019 03:12होमपेज › Sangli › पाणी योजना करण्याची पाटबंधारे विभागाकडे मागणी

श्रमिक मुक्ती दलाचा सांगलीत मोर्चा

Published On: Aug 27 2018 4:54PM | Last Updated: Aug 27 2018 4:53PMसांगली : प्रतिनिधी 

दुष्काळी भागातील टेंभू आणि ताकारी पाणी योजना तातडीने सुरु कराव्यात, महावितरणचे थकीत वीज बिल टंचाईतून किंवा साखर कारखान्याकडून घेऊन भरावे आदी मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाने पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला.

विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चामध्ये श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, आनंदराव पाटील आदी खानापूर, कडेगाव, आटपाडी, सांगोला या तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चातील शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. दुष्काळी भागात अपुरा पाऊस आहे त्यामुळे पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. पाणी योजना सुरू केल्या तरच पिके वाचतील. त्यासाठी शेतकर्‍यांचे कापून घेतलेले पैसे संबंधित साखर कारखान्यांकडून घ्यावेत. त्याशिवाय सरकारच्या टंचाई निधीची रक्कम आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील रक्कम वीज बिलासाठी घेण्यात यावी. ज्या शेतकर्‍यांना पाण्याची नितांत गरज आहे. त्यांच्याकडून आगाऊ पाणीपट्टी आणि वीज बिल भरून घ्यावे. साखर कारखान्यांकडून सुद्धा संबंधीत सभासदांच्या साठी आगाऊ पैसे भरून घेतल्यास हा प्रश्न मिटू शकतो ,अशी भूमिका आंदोलनातील सहभाग असलेल्या शिष्टमंडळाने मांडली 

योजना सुरू न झाल्यास सोमवारपासून ठिया आंदोलन 

त्या आठ दिवसांत थकीत वीजबिल भरून पाणी योजना सुरू न झाल्यास सोमवार ( दि ३)पासून बेमुदत ठिया आंदोलन करण्यातील असाही इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.