Wed, Sep 19, 2018 11:06होमपेज › Sangli › केरळ पूरग्रस्तांना सांगलीकरांची मदत (video)

केरळ पूरग्रस्तांना सांगलीकरांची मदत (video)

Published On: Aug 21 2018 1:44PM | Last Updated: Aug 21 2018 1:44PMसांगली :  प्रतिनिधी

केरळ येथील पूरग्रस्तांना काल सांगलीतून  सांगलीतुन १४  टन फूड पॅकेट आणि ४ लाख ४० हजाराची मदत केरळ पूरग्रस्तांसाठी रवाना झाली आहे.  ही मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. 

गेल्या आठवड्यात केरळ राज्याला   पूराचा मोठा फटका बसला.   अनेक लोक बेघर झाले आहेत. त्यांना मदतची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पाटील यांनी तिरुअनंतपूरम येथील जिल्हाधिकार्‍यांना संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी पहिल्या टप्यात पॅकिंग असलेले खाद्यपदार्थ देण्याचे आवाहन केले. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी सोशल मिडियाव्दारे संदेश पाटवून लोकांना मदतीचे आवाहन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  तहसिल कार्यालयातही व्यवस्था केली आहे. 

 चितळे उद्योग समुहाकडून काल  दूध पावडर, बाकरवडी, आणि भडंग, पूरवठा विभागाकडून १ टन बिस्किट, त्याशिवाय विविध संघटना, पत्रकार यांच्याकडूनही वस्तूच्या स्वरुपात मदत देण्यात आली. खासदार संजय पाटील यांच्याकडून ५० हजार महादेव जुगंदर यांच्याकडून ५५ हजार ५५५, प्रशांत गंगधर यांच्याकडून ५१हजार, हुतात्मा समुहाकडून २५ हजार रुपये असे ३ लाख २१२रुपयाचे धनादेश जमा झाले आहेत. मदतीचा ओघ चालूच आहे.