Wed, Mar 20, 2019 22:55होमपेज › Sangli › जिल्हा परिषद शाळा ‘अ’ श्रेणीत पुढे

जिल्हा परिषद शाळा ‘अ’ श्रेणीत पुढे

Published On: Dec 23 2017 2:11AM | Last Updated: Dec 23 2017 12:05AM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अनुदानित, विनाअनुदानित 2 हजार 983 शाळांमध्ये 1 हजार 239 शाळा  ‘शाळासिद्धी’मध्ये ‘अ’ श्रेणीत आल्या आहेत. ‘अ’ श्रेणीतील शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या 779 शाळांचा समावेश आहे. हे प्रमाण 63 टक्के आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व सतराशे शाळा ‘अ’ श्रेणीत येण्यासाठी कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. 

शाळांची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाचा ‘शाळासिद्धी’ हा कार्यक्रम सुरू केला आहेे. शाळांच्या स्वयंमुल्यांकनानुसार शाळांची श्रेणीनिहाय स्थिती सादर झाली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची संख्या 2938 आहे. त्यापैकी 1239 शाळा अ श्रेणीत आल्या आहेत. ‘ब’ व ‘क’ श्रेणीतील शाळा उर्वरीत शाळा ‘अ’ श्रेणीत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सतराशे शाळांपैकी 779 शाळा ‘अ’ श्रेणीत आल्या आहेत. उर्वरीत शाळा ‘अ’ श्रेणीत आणण्यासाठी शिक्षक, शिक्षक संघटना, शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या सहाय्याने प्रयत्न केले जाणार आहेत.  जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढत आहे. भौतिक सुविधाही वाढत आहेत. ब व क श्रेणीतील शाळाही अ श्रेणीत आणल्या जातील, असे राऊत यांनी सांगितले.