Wed, May 22, 2019 06:38होमपेज › Sangli › जि.प.चा इस्लामपूर बाजार समितीला धक्का

जि.प.चा इस्लामपूर बाजार समितीला धक्का

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:08AMसांगली : प्रतिनिधी

इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कराराचा भंग करून आष्टा येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर परस्पर बांधकाम सुरू केल्याने भाडेकरार रद्द करण्याचा ठराव शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या विशेष समितीने कायम केला. इस्लामपूर बाजार समितीला भाडेतत्त्वावर दिलेली 148 गुंठे जागा काढून घेण्याचा निर्णय झाला. बाजार समितीला हा ‘जोर का झटका’ आहे.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, काँग्रेसचे गटनेते सत्यजित देशमुख, पक्षप्रतोद जितेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड, सदस्या आशाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, कार्यकारी अभियंता (बांधकाम) संजय माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या विशेष समितीची बैठक झाली. जिल्हा परिषदांच्या जागांचे विकसन, स्वीय निधी उत्पन्नवाढीसंदर्भात ही विशेष समिती नियुक्त केलेली  आहे. 

जिल्हा परिषदेच्या जागेवर 30 लाखांचे बांधकाम परस्पर जिल्हा परिषदेने इस्लामपूर बाजार समितीला सन 2012 मध्ये जनावरांच्या बाजारासाठी 25 गुंठे जागा भाडेतत्त्वाने दिली होती. त्यानंतर सन 2016 मध्ये हळद व्यापारासाठी बाजार समितीला 123 गुंठे जागा भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत झाला हा करार होण्यापूर्वीच बाजार समितीने 88 गुंठे जागेवर जिल्हा परिषदेच्या परस्पर बांधकाम सुरू केले. सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्च केले आहेत. बाजार समितीने कराराचा भंग करून बांधकाम सुरू केल्याने जिल्हा परिषदेने करार रद्द केला होता.