Thu, Jun 27, 2019 17:47होमपेज › Sangli › पोलिसपुत्रासह एजंटाच्या बँक खात्यांची माहिती मागविली

पोलिसपुत्रासह एजंटाच्या बँक खात्यांची माहिती मागविली

Published On: Dec 23 2017 2:11AM | Last Updated: Dec 22 2017 9:27PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस पुत्रासह मुख्य एजंटाच्या बँक खात्याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यांनी कोणाकडून पैसे घेतले तसेच कोणा-कोणाच्या खात्यावर ते वर्ग केले आहेत ते यातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच ही माहिती मागविल्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले. हे दोघे मलेशियातील जीवा नावाच्या व्यक्तीकडे तरुणांना पाठवत होते. जीवा मलेशियाचा नागरिक असल्याने त्याच्यावर कारवाई करताना अनेक अडचणींना पोलिसांना तोंड द्यावे लागणार आहे. या दोघांच्या खात्यावरून जीवाला पैसे पाठविले असल्यास त्याचेही डिटेल्स या माहितीतून पुढे येणार आहेत. 

मुख्य एजंट धीरज पाटीलसह पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याच्याकडे पोलिस कसून चौकशी करीत आहेत. त्यांच्याकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. दोघांकडेही वेगवेगळी चौकशी करण्यात आली आहे. त्यात दोघेही एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. त्यांनी जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या दोघांनी आतापर्यंत 15 युवकांना मलेशियात नोकरीसाठी पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील चौघे सध्या कारागृहात आहेत तर पाचजण मलेशियातील भारतीय दुतावासात शरण आले आहेत. ते पाच तरुण डिसेंबर अखेरीस भारतात परतणार असल्याचे सांगण्यात आले. ते परतल्यानंतर त्यांचेही जबाब सांगली शहर पोलिस घेणार आहेत.