Thu, Jul 18, 2019 00:52होमपेज › Sangli › सांगलीत कडेकोट पोलिस बंदोबस्तात पद्मावत प्रदर्शित

सांगलीत कडेकोट पोलिस बंदोबस्तात पद्मावत प्रदर्शित

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 11:03PMसांगली : प्रतिनिधी

बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेला पद्मावत चित्रपट बुधवारी सांगलीतील दोन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. सायंकाळी सहानंतर याचे दोन खेळ आयोजित करण्यात आले होते. गुरुवारपासून या चित्रपटाचे नियमित खेळ सुरू होणार आहेत. दरम्यान, याबाबतच्या वादामुळे जिल्हा पोलिस दलाने चित्रपटगृहांना कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी सांगितले. 

करणी सेनेसह विविध संघटनांनी पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे गुरुवारपासून हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. मात्र सांगलीत बुधवारी सायंकाळीच दोन चित्रपटगृहात याच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्यांची असल्याचे स्पष्ट केले आहे. 

त्यामुळे आज चित्रपट प्रदर्शित होताच संबंधित चित्रपटगृहांना मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारपासून त्याचे नियमित खेळ सुरू होणार आहेत.