Wed, May 22, 2019 21:19होमपेज › Sangli › लोकांनो, तक्रार देण्यासाठी निर्भयपणे पुढे या

लोकांनो, तक्रार देण्यासाठी निर्भयपणे पुढे या

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 11:36PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

जिल्ह्यात बेसिक पोलिसिंगवर भर देण्यात येणार आहे.  वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी जनतेची मदत घेणार आहे. अवैध व्यावसायिकांना लगाम लावण्यात येईल. कोणत्याही मोठ्या व्यक्तीविरोधात तक्रार असूदे मी कारवाई करणार आहे.  लोकांनी तक्रार देण्यासाठी निर्भयपणे पुढे यावे असे आवाहन पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केले.  जनतेच्या सेवेसाठीच अधिकारी असतात याचे प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले आहे. जनतेच्या सेवेसाठीच मी येथे आलो आहे. शहरासह जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अन्य शासकीय विभागांना सोबत घेण्यात येईल. तसेच यामध्ये आता आरएसपीचे विद्यार्थी घेतले आहेत. त्याशिवाय पोलिस मित्र आणि नागरिकांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.

कोणत्याही प्रकारचे अवैध व्यावसायिक ताकदवान होऊ नयेत याकडे आपले विशेष लक्ष असेल. त्यांना लगाम घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. खंडणी, सावकारीसह अन्य कोणताही गुन्हा असो नागरिकांनी तक्रार देण्यासाठी निर्भयपणे पुढे यावे. पोलिस दलातील नव्वद टक्के लोक चांगले आहेत. चांगले करणार्‍यांना प्रेरणा देण्यात येईल. यापुढे जिल्ह्यात झिरो पोलिस हा प्रकार निदर्शनास येणार नाही, असेही ते म्हणाले. आतापर्यंत जिल्ह्यातील इस्लामपूर, मिरज, विटा, तासगाव उपविभागातील पोलिस ठाण्यांना भेटी दिल्या आहेत. केवळ जत उपविभागातील पोलिस ठाण्यांना भेटी देण्याचे राहीले आहे.