Sun, Jul 21, 2019 09:55होमपेज › Sangli › ‘पुढारी’ मुळे खंडपीठचा प्रश्‍न लागला मार्गी

‘पुढारी’ मुळे खंडपीठचा प्रश्‍न लागला मार्गी

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 12:41AMसांगली  : प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे सुरू करण्यासंदर्भांत मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाले. त्यावेळी ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासह खंडपीठ कृति समितीचे पदाधिकारीही उपस्थित होेते. या मागणीसाठी   डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सुरुवातीपासून सातत्याने पुढाकार घेतला. शासनाकडे पाठपुरावा केला. दैनिक पुढारीतून सातत्याने खंडपीठाची आवश्यकता मांडली. त्यामुळेच हा प्रश्‍न मार्गी लागला आहे, अशा प्रतिक्रिया ज्येष्ठ वकील  , पक्षकार व्यक्त करीत आहेत.

वकीलांनी व्यक्त केलेल्या काही प्रातिनिधीक प्रतिक्रिया अशा :

डॉ. जाधव यांच्यामुळे प्रक्रिया गतीमान भाजप - सेना युती सरकारने लोकांची न्याय मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार. कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्हयांसाठी कोल्हापूर येथे खंडपीठ सुरू करावे अशी मागणी येथील सर्वसामान्य पक्षकार व राजकीय पक्ष गेली 25 वर्षे करीत आहेत. ना. फ डणवीस यांनी या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन खंडपीठासाठी शंभर कोटी निधी व जागा देणार असल्याची घोषणा केली आहे. ही मागणी पूर्ण होण्यासाठी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दैनिक पुढारीतील लिखाणाच्या माध्यमातून व मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने प्रत्यक्ष पाठपुरावा केल्यामुळे खंडपीठाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे, असे  माजी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. वसंतराव मोहिते यांनी सांगितले.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा पुढाकार 

दैनिक पुढारीचे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या प्रत्यक्ष सहभाग व पुढाकारामुळे कोल्हापूरला लवकरच खंडपीठ सुरू होत आहे. सध्या सांगली, कोल्हापूर, सातारा , रत्नगिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर जिल्हयांतील सुमारे 55 हजार खटले उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.कोल्हापूर खंडपीठसाठी वकील, पक्षकार व राजकीय पक्षांच्यावतीने गेल्या 25 वर्षांत अनेक आंदोेलने झाली आहेत. या आंदोलनाच्या व लोकांच्या मागणीबाबत दैनिक पुढारीने सातत्याने निर्भिड लिखाण केले. त्यामुळे खंडपीठ विषय मार्गी लागण्याचे श्रेय दैनिक पुढारी,  खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी , आंदोलनात सहभागी झालेले वकील, पक्षकार व सर्व राजकीय पक्षांना जाते, असे सांगली वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप हारुगडे यांनी सांगितले.

डॉ. जाधव यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

मुंबई उच्च न्यायालयात सध्या सुमारे 55 हजार दावे व खटले प्रलंबित आहेत. या दाव्यांतील पक्षकारांना मुंबईला जाणे खर्चिक व त्रासदायक ठरते. आता कोल्हापूरला खंडपीठ सुरू झाल्यास या पक्षकारांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे व लवकर न्याय मिळण्यास मदत होणार आहे. दैनिक पुढारीचे मुख्य  संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे तसेच खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकार्‍यांचे आभार मानले पाहिजेत, असे सांगली वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश भोसले म्हणाले.

डॉ. जाधव, एन.डी. पाटील व खंडपीठ कृती समिती यांचे योगदान

कोल्हापूर खंडपीठसाठी शंभर कोटीची तरतूद व पंचाहत्तर एकर जागा देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र  फ डणवीस यांनी जाहीर केले आहे. त्याशिवाय आवश्यक ती सर्व मदत करण्याचे मान्य केले आहे.  शासनाने त्यांचे काम केले आहे. आता उच्च न्यायालयाने देखील शासनाला व सहा जिल्हयांतील लोकांच्या न्याय मागणीला सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक आहे. शासनाने देखील भूमी संपादन प्रक्रिया, इमारत बांधकामासाठी निधी याबाबत लवकर पूर्तता करून खंडपीठ सुरू करावे अशी अपेक्षा आहे. खंडपीठासाठी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, एन.डी. पाटील व खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत असे माजी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. चंद्रकांत माने म्हणाले.