Tue, Apr 23, 2019 10:23होमपेज › Sangli › सहायक फौजदार निलंबित

सहायक फौजदार निलंबित

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 09 2017 12:05AM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

अनिकेत कोथळेचा खून होण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पगारावरून अनिकेत आणि व्यापारी नीलेश खत्री यांच्यात वादावादी, मारामारी झाली होती. त्याची दखल न घेतल्याने, तसेच त्याबाबत डायरीत नोंद न केल्याने शहर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार सुभाष कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली. दि. 6 नोव्हेंबरला रात्री वाटमारीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अनिकेतला युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोलीतील कावळेशेत येथे नेऊन जाळला होता. या प्रकरणात तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची बदली करण्यात आली आहे. तर कामटेसह हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, गाडीचालक राहुल शिंगटे यांना प्रथम निलंबित, नंतर बडतर्फ करण्यात आले आहे. अनिकेतचा खून होण्यापूर्वी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पगारावर अनिकेत व व्यापारी नीलेश खत्री यांच्यात वादावादी होऊन मारामारी झाली होती.