Tue, Nov 20, 2018 03:21होमपेज › Sangli › कवलापुरात एकाची गळफासाने आत्महत्या

कवलापुरात एकाची गळफासाने आत्महत्या

Published On: Dec 05 2017 1:43AM | Last Updated: Dec 04 2017 7:54PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

कवलापूर  (ता. मिरज) येथील तानाजी चौक परिसरात एकाने राहत्या घरी लोखंडी अँगलला  दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विष्णू नामदेव पवार (वय 55) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळी चारपूर्वी ही घटना घडली. जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवली  होती.

पवार गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबापासून विभक्त राहत होते. रविवारी दुपारी त्यांनी घरातील पत्र्याच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतला. त्यातच  त्यांचा  मृत्यू झाला.  सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यावेळी त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना  मिळाली.