Tue, Jul 23, 2019 11:18होमपेज › Sangli › शाहिरांनो भीक मागणे सोडून द्या 

शाहिरांनो भीक मागणे सोडून द्या 

Published On: Dec 18 2017 2:42AM | Last Updated: Dec 17 2017 8:17PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

आंबेडकरवादी लोककलाकारांना अजूनही भीक मागून जगत आहेत. तुटपुंज्या मानधनावर त्यांना दिवस काढावे लागत आहे. स्वाभिमानाने जगायचे असेल तर कलाकारांनी एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन गायक नंदेश उमप यांनी केले. नागपूर येथील आंबेडकरवादी साहित्य कला व तत्वज्ञान विचार मंचच्या सांगली शाखेच्यावतीने अखिल भारतीय आंबेडकरवादी शाहिरी व लोककला संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील उपस्थित होते. 

उमप पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण शिक्षित झालो. पण अजूनही संस्कारी झालेलो नाही. आंबेडकरवादी साहित्य, शाहिरी परंपरा पुढे नेली पाहिजे. परंतु काहीजण दुफळी निर्माण करीत आहेत. प्रत्येकाने वेगळी चूल निर्माण केलेली आहे. त्यामुळे कलाकार आणि शाहिरांना अजूनही तुटपुंज्या मानधनाची भीक मागावी लागत आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष खेमराज भोयर, स्वाती बंगाळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष शाहीर राहुल साबळे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कांबळे यांनी आभार मानले. हणमंत साबळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी देवानंद माळी, नगरसेवक बाळासाहेब गोंधळे, बिरेंद्र थोरात आदी उपस्थित होते.