Thu, Jul 18, 2019 15:05होमपेज › Sangli › सांगली मिरज विभाजन विकासाचा महामार्ग

सांगली मिरज विभाजन विकासाचा महामार्ग

Published On: Dec 23 2017 2:11AM | Last Updated: Dec 22 2017 9:34PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी  विभागजन होऊन सांगली, मिरज या दोन स्वतंत्र महापालिका होणे गरजेचे आहे. खर्‍या अर्थाने हा विकासाचा महामार्गच ठरेल, अशा प्रतिक्रिया आमदार, महापौर, नगरसेवकांसह लोक प्रतिनिधींनी व्यक्त  केल्या. यासाठी शासनदरबारी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. सर्व सहमतीने निर्णय शक्य :  आमदार सुधीर गाडगीळ
तीन शहरांच्या महापालिकेचा 118 चौरस किलोमीटर विस्तार पाहता महापालिकेचे उत्पन्न अपुरे आहे.

शिवाय तीनही शहरे निमशहरी अवस्थेत आहेत. त्यांच्या नागरी सुविधांसाठी मोठे आव्हान आहे. यासाठी अर्थात नियोजनाचा अभाव हेही विकास न होण्याचे कारण आहेच. पण लोकसंख्या सहा लाखांच्या वर गेल्याने दोन्ही शहरांची स्वतंत्र महापालिका होऊ शकते. याबाबत सर्वानुमते, अगदी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चेने याबाबत पक्षीय भूमिका ठरेल. पण दोन स्वतंत्र महापालिकांना निधी, योजना स्वतंत्र मिळेल. उत्पन्न टार्गेटसह सर्वच नियोजनाच्यादृष्टीनेही फायदा होऊ शकेल.  विकासाच्यादृष्टीने हिताचा निर्णय : आमदार सुरेश खाडे तीन शहरे अद्याप समरस होऊ शकली नाहीत.

शिवाय नेहमीच तीनही शहरांची महापालिकेकडून विकासाबाबत आपल्यावर अन्याय होत असल्याची ओरड आहे. वास्तविक शहराच्या तुलनेत उत्पन्नाचे स्त्रोत अपुरे आहेत. शासनाकडूनच विकासाचा मोठ्या प्रमाणात टेकू दिल्याशिवाय शहरे महानगरे बनू शकणार नाहीत. यासाठीच दोन्ही स्वतंत्र महापालिका हा त्यासाठी पर्याय ठरू शकतो. तसा निर्णय घेतल्यास तीनही शहरांचा विकास होईल. त्यासाठी दोन्ही महापालिकांच्यादृष्टीने आसपासच्या खेड्यांचा समावेश होऊ शकेल. आता जीएसटी समान करप्रणालीमुळे कोणतीही अडचण नाही. सोबतच शहरीकरणाचे लाभही त्या गावांना मिळतील. त्यादृष्टीने सर्वार्ंनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. विकासाचे अडथळे दूर होतील : दिग्विजय सूर्यवंशी तीन शहरांची महापालिका करून तसा सांगलीवर अन्यायच झाला.

वास्तविक मिरजेचे 20 नगरसेवक आणि एका प्रभाग समितीपुरता कारभार हा नेहमीच सांगली, कुपवाडवर दादागिरी करणारा ठरला आहे. उत्पन्नाच्या तुलनेत मिरजेला अधिक लाभ मिळाला. पण त्याचा फायदा शहराला झाला नाही. नेत्यांना न मानणारी मिरजकरांची संस्कृती ही मी आणि माझ्यापुरतीच राहिली आहे. ते काही असो, पण त्यांना त्यांचे राज्य देऊन दोन महापालिका या विकासातील अडथळे दूर करणार्‍या ठरतील. दोन्हीसाठी स्वतंत्र निर्णय, कारभार आणि निधी हा विकासाची पायवाट असेल. त्यादृष्टीने सर्वपक्षीय रेट्याची गरज आहे. युतीच्या काळात हाही निर्णय व्हावा : नगरसेवक सुरेश आवटी  तत्कालीन युती शासनाच्या काळात तीन शहरांची महापालिका झाली.

वास्तविक त्यावेळीच सांगली, मिरज या स्वतंत्र महापालिका होणे गरजेचे होते. ते झाले नाही. पण आता लोकसंख्येचा विस्तार पाहता शक्य आहे. 118 चौरस किलोमीटरसाठी 500 कोटींचे अंदाजपत्रक, अपुरी प्रशासकीय यंत्रणा असे अनेक  प्रश्‍न आहेत. दोन स्वतंत्र महापालिका झाल्यास हे सर्व प्रश्‍न सुटतील. आताही महायुतीचे शासन आहे. दोन आमदार, खासदारांच्या माध्यमातून हा निर्णय व्हावा. यासाठी प्रयत्न करायला आम्हीही तयार आहोत.  दोन्ही शहरांसाठी चांगलेच : मैनुद्दीन बागवान, जमील बागवान सांगली, मिरजेची संस्कृती वेगळी आहे. नेहमीच दोन्ही शहरांत सत्तासंघर्ष राहिला आहे. सांगली, मिरज व कुपवाड शहरांच्या मर्यादा या एका महापालिकेमार्फत पूर्ण होणे शक्यच नाही. जे पदाधिकारी असतात, तेही आपापल्या शहरापुरताच विचार करतात. त्यामुळे मूलभूत समस्या 18 वर्षांत सुटल्या नाहीत. मिरज पॅटर्न हा मिरजेसाठी बदनामीकारक ठरला आहे. सर्वांगीण विकास होईल :

हणमंत पवार, माजी नगरसेवक मनपा स्थापनेवेळीच स्वतंत्र  दोन महापालिकांसाठी आम्ही लढा उभारला होता. पण जकातीसह विविध कारणांनी विरोध झाला. आता जीएसटीमुळे त्या अडचणी नाहीत. आता हा पर्याय होऊ शकतो. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी उठाव करावा. सांगली आणि मिरज शहराच्या सर्वांगिण विकासासाठी या दोन्ही महापालिका स्वतंत्र करण्याची गरज आहे. सध्या महापालिकेचा कारभार शासनाच्या अनुदानावर सुरू आहे. उत्पन्नाचा स्वतंत्र स्त्रोत असणे आवश्यक आहे.