Wed, Sep 18, 2019 21:15होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे सांगलीमध्ये झुंबा वर्कशॉप

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे सांगलीमध्ये झुंबा वर्कशॉप

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 9:12PM

बुकमार्क करा
सांगली ः प्रतिनिधी 

आज धकाधकीच्या व धावत्या जगात आपण स्वत:ला वेळ देणे विसरून जातो आणि मग पाठीमागे लागतात अनेक आजार व विकार.म्हणूनच दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब खास कस्तुरी मेंबरसाठी झुंबा वर्कशॉप घेऊन येत आहे. नवीन वर्षात एक नवीन संकल्प घेऊन महिलांसाठी ही संधी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब व प्रदीप सातपुते फिटनेस अ‍ॅकॅडमी, मिरज देत आहेत. 

प्रदीप सातपुते फिटनेस अ‍ॅकॅडमी ही गेली पाच वर्षे मिरज येथे कार्यरत आहे. आज सांगली येथे झुंबा वर्कशॉप होणार आहे. या  वर्कशॉपची वेळ 12.30 ते 1.30 आहे. झुंबा वर्कशॉपसाठी मिरज शहरातील महिला नाव नोंदवू शकतात. तसेच कस्तुरी क्‍लबच्या सभासद नोंदणी करू शकतात. 

झुंबा वर्कशॉपसाठी कस्तुरी महिलांना मोफत प्रवेश राहील.  तसेच झुंबा वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी दै. पुढारी भवन येथे नाव नोंदणी आवश्यक आहे.  इतर महिलांना  200 रुपये प्रवेश फी आहे. तसेच लगेच मेंबर होऊ इच्छिणार्‍यांनाही मोफत प्रवेश राहील. महिला कस्तुरी सभासद नोंदणी कार्यक्रमाच्या ठिकाणी करू शकतात.  

झुंबा वर्कशॉप   सांगलीत वृत्तपत्र विक्रेता भवन, त्रिकोणी बागेजवळ आहे. यावेळी कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी फी 500 रुपये आहे. सभासद झाल्यानंतर लगेचच नॉनस्टिक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार आहे. 

सभासद महिलांना वर्षभर तसेच विविध दुकानांमधून डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ गिफ्टस् मिळणार  आहेत.  याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत  आहे.