Tue, Jul 23, 2019 02:09होमपेज › Sangli › गोकुळनगरमध्ये छापा, 2 मुली ताब्यात

गोकुळनगरमध्ये छापा, 2 मुली ताब्यात

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 12:35AMसांगली : प्रतिनिधी

येथील गोकुळनगरमध्ये वेश्या व्यवसायात अल्पवयीन मुली असल्याच्या संशयावरून पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू होता. गोकुळनगरमध्ये वेश्या व्यवसायात दोन अल्पवयीन मुली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सायंकाळी पथकाने छापा टाकला. त्यामध्ये दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले.  याबाबत पोलिस निरीक्षक राजन माने यांनी सांगितले की, दोन मुलींना संशयावरून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.