Sun, Jul 21, 2019 12:03होमपेज › Sangli › शेतकर्‍यांनी बिजोत्पादनाचा कार्यक्रम राबवावा : कोरडे

शेतकर्‍यांनी बिजोत्पादनाचा कार्यक्रम राबवावा : कोरडे

Published On: Dec 16 2017 1:48AM | Last Updated: Dec 15 2017 9:18PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

खर्च टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात  बिजोत्पदनाचा कार्यक्रम राबवावा, असे आवाहन अहमदनगर विभागीय बीज प्रमाणिकरण अधिकारी यशवंत कोरडे यांनी केले आहे. ते म्हणाले, प्रत्येक हंगामात सुधारित व अधिक उत्पादन देणार्‍या नवीन वाणाचे बियाणे खरेदी करणे शेतकर्‍यांना परवडणारे नाही.

त्यामुळे शतकर्‍यांनी आपल्याच शेतात बिजोत्पादन करावे. त्यासाठी कृषि विद्यापीठ व आगरकर संशोधन संस्थेकडे तसेच महाबीजकडे सुधारित व अधिक उत्पादन देणारे गहू पिकाचे बियाणे उपलब्ध आहे. पेरणीनंतर संबंधित जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी कार्यालयाकडे त्याची नोंदणी करावी. 

शेतकर्‍यांना पायाभूत बियाणे उपलब्ध होऊन विक्रीतून अधिक उत्पन्नही मिळेल. इच्छुक शेतकर्‍यांनी  अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी कार्यालयाशी संपर्क 
साधावा.