Tue, Jul 23, 2019 04:15होमपेज › Sangli › नवीन हळदीच्या सौद्यास उद्या प्रारंभ

नवीन हळदीच्या सौद्यास उद्या प्रारंभ

Published On: Jan 21 2018 2:54AM | Last Updated: Jan 20 2018 8:18PMसांगली : प्रतिनिधी

सांगली मार्केट यार्डात नवीन हळद विक्री सौद्याचा प्रारंभ सोमवारी सकाळी 10.45 वाजता होणार आहे. हळदीची आवक वाढविणे, अद्यावत हळद मार्केट यासंदर्भात शेतकरी, चेंबर ऑफ कॉमर्स, व्यापारी, अडते यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी माहिती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली. नवीन हळद सौद्यास मार्केट यार्डातील श्री गणपती जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघाच्या दुकानापासून प्रारंभ होणार आहे. हळद उत्पादक शेतकरी, मार्केट यार्डातील हळद खरेदीदार व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदार व इतर संबंधित घटकांनी हळद सौद्याला उपस्थित रहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. 

सभापती पाटील म्हणाले, सन 2014-15 मध्ये  10 लाख क्विंटल हळदीची आवक होती. सन 2015-16 मध्ये 9 लाख 36 क्विंटल आवक झाली. सन 2016-17 मध्ये 6 लाख 25 हजार क्विंटल आवक झाली. सन 2017-18 च्या नऊ महिन्यात 6 लाख 77 हजार क्विंटल आवक झाली आहे.  यार्डात स्थानिक तसेच परपेठेतील हळदीची आवक आणखी वाढावी यासाठी शेतकरी, व्यापारी, अडते यांच्याशी चर्चा करणार आहे.