Thu, Sep 20, 2018 22:09होमपेज › Sangli › राजकीय पक्ष काढण्याचा विचार नाही

राजकीय पक्ष काढण्याचा विचार नाही

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 09 2018 10:30PMसांगली : प्रतिनिधी

राजकीय पक्ष  काढण्याचा आमचा कोणताही विचार नाही. ‘नाम’च्या माध्यमातून महाराष्ट्र टंचाईमुक्‍त कऱणे आणि शेतकर्‍यांना चांगले दिवस आणणे हेच माझे स्वप्न आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाऊंडेशनचे प्रमुख मकरंद अनासपुरे यांनी येथे केले.  अनासपुरे यांच्या ‘उलट सुलट’ या प्रयोगातून  आभाळमाया फांऊडेशन यांच्या प्रयत्नातून जमा झालेल्या 8 लाख 88 हजार 888 रुपयाचा धनादेश  प्रमोद चौगुले यांच्याकडून जलयुक्‍त शिवारच्या कामासाठी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांच्याकडे देण्यात आला. त्यावेळी अनासपुरे बोलत होते. 

ते   म्हणाले, आमच्या या उपक्रमास सर्वच पक्ष, संघटना यांचे पाठबळ आहे. राज्यातील विविध भागात 200 ठिकाणी आमची कामे सुरू आहेत.   जिल्ह्यात 20 ठिकाणी कामे झाली असून त्यामुळे 288 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या वर्षी 50 गावे निवडण्यात आली असून 13 गावांत  काम सुरू झाले आहे.  उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक  केले. 
 

 

 

Sangli,news, nam, Foundation,chief, Makrand, Anaspure, Political, party,