Wed, Feb 20, 2019 08:37होमपेज › Sangli › सत्ता मिळालेल्या सर्व महापालिकेत भाजप अपयशी

सत्ता मिळालेल्या सर्व महापालिकेत भाजप अपयशी

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 11:24PMसांगली : प्रतिनिधी

ज्या-ज्या महापालिकेत भाजपची सत्ता आली तिथे-तिथे भाजप विकास कामात अपयशी ठरली आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला. सांगली महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी उमेदवारांच्या प्रचारात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रचारार्थ बैठका व प्रचार सुरू केला आहे. या दरम्यान ठिकठिकाणी झालेल्या प्रचार बैठकांमध्ये ते बोलत होेते. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे सोबत होते. 

जयंत पाटील दुपारी 1 वाजता प्रमुख पदाधिकार्‍यांसह प्रभाग 18 मध्ये पोहोचले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार यात्रेत सहभागी झाले. उमेदवार व कार्यकर्त्यांकडून प्रचाराचा आढावा घेतला. शेवटचे चार दिवस महत्वपूर्ण असून नेटाने प्रचार करण्याच्या सुचना दिल्या. 

जयंत पाटील दुपारी 1.30 वाजता प्रभाग 17 मध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात बैठक घेतली. पदयात्रा, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी याची माहिती घेतली. ‘पुणे, पिंपरी-चिंचवडसह ज्या-ज्या महापालिकेत भाजपची सत्ता आली तिथे-तिथे भाजप विकास कामात अपयशी ठरली आहे.  मतदारांपर्यंत जाऊन ही सारी माहिती द्या. भाजपच्या विकासाचा पोलखोल करा, अशा सुचना पाटील यांनी उमेदवार व कार्यकर्त्यांना दिल्या. 

पाटील यांनी  दुपारी 2.15 वाजता प्रभाग 19 मध्ये एका कार्यकर्त्याच्या घरी प्रभागातील प्रचाराचा आढावा घेतला. दुपारी 3 वाजता प्रभाग 1 मधील आंबा चौकात कार्यकर्त्याच्या घरी प्रभागातील प्रचाराची आढावा बैठक झाली. प्रभाग 2 व प्रभाग 8 या दोन्ही प्रभागांची एकत्र बैठक दुपारी 3.30 वाजता झाली. प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 20, प्रभाग क्रमांक 12 मध्ये आढावा बैठक घेतली.