Mon, Apr 22, 2019 15:39होमपेज › Sangli › शिवसेनेच्या प्रचार फेरीत ‘भाऊजीं’चे आकर्षण

शिवसेनेच्या प्रचार फेरीत ‘भाऊजीं’चे आकर्षण

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 11:10PMसांगली : प्रतिनिधी

सांगली महापालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने शिवसेना नेते  आणि अभिनेते होममिनिस्टर फेम आदेश बांदेकर (भाऊजी) मतदारांचे आकर्षण ठरले. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.  दरम्यान  शहरातील विविध भागात काढलेल्या प्रचार फेरीत त्यांनी  निवडणुकीच्या खेळात शिवसेनेलाच विजय करा, असे आवाहन केले. 

लाडक्या भाऊजींना पाहण्यासाठी सांगली, मिरज व कुपवाडमधील महिलांनी अलोट गर्दी केली होती. ठिकठिकाणी महिलांनी पंचारतीने ओवाळून त्यांचे स्वागत केले.   बांदेकर यांनी प्रभाग क्रमांक 9, 8 आणि 2 या भागात विविध ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभूते, आनंदराव पाटील, नगरसेवक शेखर माने यांच्यासह शिवसैनिक, उमेदवार या पदयात्रेत सहभागी झाले होते. 

आदेश बांदेकर यांना पाहण्यासाठी महिलांनी सर्वच ठिकाणी गर्दी केली होती. बांदेकरांनी महिलांशी संवाद साधला, ते म्हणाले, मी इथे होममिनिस्टर कार्यक्रमातला कोणताही खेळ-खेळण्यासाठी आलो नाही.   सध्या निवडणूकीचा खेळ सुरू आहे.   जर या खेळात चांगले खेळाडू हरले तर तुम्हा सर्वांना नेहमी सारखाच पश्चाताप करण्याची वेळ येईल. म्हणून शिवसेनेच्या लढवय्या खेळाडूंना आपण निवडून द्या आणि महापालिकेत पाठवा. त्यातच आपले भले आहे. देशात आणि जगात जी परिवर्तने घडली आहेत त्यामध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. सांगली,मिरज व कुपवाड शहरातील शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देवून या शहरातही आपण परिवर्तन घडवून आणावे, असे आवाहन त्यांनी केले.