Sun, Nov 18, 2018 20:20होमपेज › Sangli › सांगलीत मोटारसायकल चोरट्यास अटक

सांगलीत मोटारसायकल चोरट्यास अटक

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 12:00AM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

शहरात रविवारी गस्त घालत असताना हसनी आश्रमजवळ पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने अट्टल मोटारसायकल चोरट्यास अटक केली. सुनील संदीपान जाधव (वय 30, रा. गणेशनगर, सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सत्तर हजार रूपये किंमतीच्या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. 

पोलिसांचे पथक रविवारी सकाळपासून शहरात गस्त घालत होते. दुपारी एकच्या सुमारास विजयनगरकडून हसनी आश्रमकडे जाणार्‍या रस्त्यावर एक विना क्रमांकाची मोटारसायकल दिसून आली. चालकाकडे चौकशी करण्यासाठी पोलिस गेले असता तो मोटारसायकलवरून पळून गेला. पोलिसांनी  पाठलाग  करून त्याला हसनी आश्रमजवळ पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने भारती हॉस्पीटलच्या पार्किंगमधून दोन मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे. त्या दोन्ही गाड्या त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.