Fri, Mar 22, 2019 07:44होमपेज › Sangli › ‘रोहयो’च्या ७.५० कोटींच्या कामांचे ऑडिट करा : सावंत

‘रोहयो’च्या ७.५० कोटींच्या कामांचे ऑडिट करा : सावंत

Published On: Jan 21 2018 2:54AM | Last Updated: Jan 20 2018 8:28PMसांगली : प्रतिनिधी

जत तालुक्यातील मनरेगाच्या 7.50 कोटींच्या जुन्या कामांचे ‘सोशल ऑडिट’ झाल्याशिवाय रक्कम देऊ नये, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे, अशी माहिती जतचे काँग्रेस नेते जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.  विक्रम सावंत, महादेव दुधाळ, कलावती गौरगोंड, जत पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेते आप्पासाहेब मासाळ, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, रविंद्र सावंत, अर्चना पाटील, अश्‍विनी चव्हाण, लता कुल्लोळी यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट 

घेतली.  जुन्या कामांमध्ये मोठी गोलमाल आहे. मात्र बिले काढण्यासाठी अधिकार्‍यांवर राजकीय दबाव आणला जात आहे. जुन्या कामांचे सोशल ऑडीट झाल्याशिवाय रक्कम आदा करू नये, अशी मागणी करण्यात आली. त्या 2.60 कोटींचीही चौकशी करा सावंत म्हणाले, जतमध्ये प्रभारी कार्यकाळात तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी सोनलगी, तिकोंडी, संख, निगडी खुर्द येथील 2.60 कोटींच्या कामांची बिले दिली आहेत.  राजकीय दबावातून ही बिले दिली आहेत. त्या कामांचीही चौकशी झाली पाहिजे. जुन्या कामांच्या बिलांत काहींचा ‘इंटरेस्ट’ आहे. त्यासाठी आटापिटा सुरू आहे. मात्र या 7.50 कोटी रुपयांच्या जुन्या कामांचे सोेशल ऑडीट झाल्याशिवाय रक्कम देऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही सावंत यांनी  दिला.