Sat, Feb 16, 2019 00:35होमपेज › Sangli › शिक्षकांचे प्रश्‍न अधिवेशनात मांडणार

शिक्षकांचे प्रश्‍न अधिवेशनात मांडणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शिक्षकांचा सध्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्यापेक्षा शिक्षणेत्तर ऑनलाईन माहिती भरण्यातच अधिक वेळ जात आहे. त्यामुळे मराठी शाळांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. शिक्षकांच्या प्रश्‍नावर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मी आवाज उठवणार आहे, असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी येथे  केले. 

येथील संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.  यावेळी त्यांच्या हस्ते मुख्याध्यापक अरविंद कदम यांचा राज्य मुख्याध्यापक संघाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि शाळेतील राष्ट्रीय व राज्यपातळीवरील  खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.  

पाटील म्हणाले, यशवंतनगर हायस्कूलसारख्या काही शाळांचा अपवाद वगळता मराठी शाळांची अवस्था बिकट होत आहे. इंग्रजी शाळांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहेत. शालेय पाठ्यपुस्तकातून मोघलांचा इतिहास हेतूपूर्वक कमी केला जात आहे.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही कमी होत आहे. सरकारचे हे धोरण चुकीचे आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी शिक्षकांचे विविध प्रश्‍न मांडले. नगरसेवक संजय बजाज, विष्णू माने, शामराव जाधव, रविंद्र कुलकर्णी, संजय पाटील, अंबादास माळी आदी उपस्थित होते. संजय कदम यांनी स्वागत केले. माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी यांनी आभार मानले.