Sat, Jul 20, 2019 23:59होमपेज › Sangli › सांगलीत विवाहितेवर बलात्कार

सांगलीत विवाहितेवर बलात्कार

Published On: Feb 12 2018 2:05AM | Last Updated: Feb 11 2018 11:33PMसांगली : प्रतिनिधी

एका विवाहितेला ‘तुझ्या पतीचा अपघात मीच केला आहे. तुझ्या मुलाचे अपहरण करेन, अशी धमकी देऊन तिच्यावर दोनवेळा बलात्कार केला. नोव्हेंबरमध्ये मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी एका युवकाविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन जयवंत सरगर (वय 35, रा. गणेशनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. 

रविवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.नोव्हेंबरमध्ये पीडित महिलेच्या पतीचा अपघात झाला होता. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी सचिन पीडित महिलेच्या घरी रात्री दीडच्या सुमारास गेला. त्यावेळी त्याने तुझ्या पतीचा अपघात मीच केला आहे. तुझ्या मुलाला शाळेतून पळवून नेईन. तसेच माझ्याशी शरीरसंबंध न ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. 

त्यानंतर पंधरा दिवसांच्या अंतराने पुन्हा तशीच धमकी देऊन त्याने पुन्हा बलात्कार केला. याप्रकरणी रविवारी पीडित महिलेने त्याच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सचिन सरगर याला अटक केली आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी सांगितले.