Fri, Mar 22, 2019 07:41होमपेज › Sangli › महेंद्र चव्हाण ‘मदनभाऊ श्री’चा मानकरी

महेंद्र चव्हाण ‘मदनभाऊ श्री’चा मानकरी

Published On: Dec 05 2017 1:43AM | Last Updated: Dec 04 2017 8:06PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

माजी मंत्री स्व. मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘मदनभाऊ श्री 2017’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार नुकताच पार पडला. पुण्याच्या महेंद्र चव्हाण याने हा किताब पटकाविला. सांगलीचा विश्‍वनाथ बकाली उपविजेता ठरला. येथील राममंदिर चौकातील इमॅन्युअल स्कूलच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. संयोजन युवानेते अतुल माने व मित्र परिवाराने केले. स्पर्धेचा प्रारंभ काँग्रेसनेत्या जयश्री पाटील यांच्याहस्ते, महापौर हारुण शिकलगार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बक्षीसवितरण युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, युवानेते डॉ. जितेश कदम व स्थायी समिती सभापती बसवेश्‍वर सातपुते यांच्याहस्ते पार पडला. 

यावेळी  काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक संतोष पाटील, बाळू गोंधळे, अतुल माने, मंगेश चव्हाण, अमर निंबाळकर आदी  उपस्थित होते. पंच म्हणून राजेंद्र हेंद्रे, शरद मारणे, मुरली वत्स, राजेश वडाम यांनी काम पाहिले. निकाल गटवार अनुक्रमे पुढीलप्रमाणे : 55-60 किलो :  ज्ञानेश्‍वर सोनावणे, सतीश बांगल, विशाल दिघे, हर्षद काटे, शुभम मोहिते. 60-65 किलो : विजय जाधव, विनोद बांगर, विक्रम धुमाळ, विवेक संकपाळ, प्रफुल्ल नाईकवडे, 65-70  किलो : फैय्याज शेख, ख्रिस जॉब, रणजित चौगुले, अजित गोडसे, विकास कुंडले. 70-75 किलो - विश्‍वनाथ बकाली, असिफ अहमद, मोहनिश आहीर, रोहित गजरे, ऋषीकेश पालत्यकर. 75-80 किलो : अमित मालवदे, अभिजितसिंह पोवार, शिवा बिराजदार, सोमनाथ माळी, हेमंत पाटील. 80-85 किलो : महेंद्र चव्हाण, जुबेश शेख, अक्षय वांजळे, राहुल कदम, संदेश नलावडे. संयोजन प्रकाश चौधरी, संतोष भोसले, रियाज कुरणे, शीतल बोंगाळे, रवी पाटील, अमित माने, बाबा शेख, महेश भंडारे, रवी शेट्टी, बसवेश्‍वर रूपनर, शब्बीर शेख आदींनी  केले.