Sun, Mar 24, 2019 08:16होमपेज › Sangli › लिंगायत समाजाचा आज सांगलीत महामोर्चा

लिंगायत समाजाचा आज सांगलीत महामोर्चा

Published On: Dec 03 2017 1:25AM | Last Updated: Dec 03 2017 1:14AM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी  रविवारी लिंगायत महामोर्चाच्या निमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्रातील 5 लाख बांधवांचा हुंकार होणार आहे. सकाळी 10 वाजता विश्रामबाग चौकात यानिमित्ताने लिंगायतांचे भगवे वादळच थडकणार आहे. मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रसंत जगद्गुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य  करणार आहेत. देशभरातील जगद्गुरू, महाराष्ट्र, कर्नाटकातील आजी-मंत्री, लोकप्रतिनिधींसह सर्वपक्षीय, धर्मिय बांधव, संघटना मोर्चात उतरणार आहेत.

नांदेड, लातूर, बेळगाव, हुबळीनंतर सांगलीतील या महामोर्चासाठी पश्‍चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील लिंगायत बांधव रस्त्यावर उतरतील. देशभरातील विविध पीठांचे जगद्गुरू यामध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. हा मोर्चा आतापर्यंतच्या लिंगायत महामोर्चाचे रेकॉर्ड  मोडेल,
 असा दावा अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने केला.  

समितीचे सिंहासने, सुशील हडदरे, प्रदीप वाले, विश्‍वनाथ मिरजकर, रविंद्र केंपवाडे, विनायक शेटे, अशोक पाटील, समन्वय समितीचे सचिव सतीश मगदूम, ए. के. चौगुले, डी. के. चौगुले, श्री. आरबोळे, आप्पा रिसवडे, सचिन घेवारे, योगेश कापसे आदींसह सर्वधर्मीय, पक्ष, समितीने याचे नियोजन केले आहे. 

श्री. सिंहासने म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून मोर्चासाठी जय्यत तयारी केली जात आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका घेऊन समाजबांधवांना एकत्र करण्यात आले. लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी सर्वधर्मीय, संघटना, पक्षांनी पाठिंबा देत रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला आहे. शांततेत आणि सर्व समावेश जाणार्‍या मोर्चासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी पिण्याचे पाणी व न्याहरीची व्यावस्था मोर्चेकरांसाठी केली आहे. विश्रामबाग चौकातच सभा होईल. तेथून दहा महिला जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांना मागण्यांचे निवेदन देतील.