होमपेज › Sangli › सांगली वकील संघटनेतर्फे 17 न्यायाधीशांचे स्वागत

सांगली वकील संघटनेतर्फे 17 न्यायाधीशांचे स्वागत

Published On: Jun 15 2018 1:07AM | Last Updated: Jun 14 2018 8:32PMसांगली : वार्ताहर

जिल्ह्यातील विविध न्यायालयात नव्याने रूजू झालेल्या 17 न्यायाधीशांचा सत्कार सांगली वकील संघटनेच्यावतीने करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या जिल्हा न्यायाधीशांची नावे अशी : श्रीमती साधना एम. शिंदे, ए. एन. पाटील, आर. आर. वैष्णव, डी. पी. सातवलेकर, श्रीमती व्ही.  ए. दीक्षित, ए.  बी. तिडके, पी. जी. भोसले, ए. आय. पेरामपल्ली तर वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांची नावे अशी : आर. व्ही. जगताप, पी. ए. साने, श्रीमती आर. जे. पाटील, श्रीमती वाय.पी. मारूलकर, के. ए. भेंडवडे, मुख्य न्यायदंडाधिकारी एल. डी. हुल्ली, ग्राहक न्यायमंचचे अध्यक्ष ए. ए. खडसे, सदस्य एस. एम. कुंभार तसेच विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही. एम. माने यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

साधना शिंदे यांनी सांगलीत येथे यापूर्वी न्यायाधीश म्हणून केलेल्या कामाचा  अनुभव सांगितला व भविष्यात वकिलांकडून तसाच सकारात्मक स्वरूपाचे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. न्यायाधीश आर. व्ही. जगताप म्हणाले,  पीडित व्यक्तिला लवकर न्याय मिळणे आवश्यक आहे. अशा जलद न्यायदानासाठी वकील संघटना, वकील व पक्षकारांनी मदत केली पाहिजे. जिल्हा न्यायाधीश  ए. एन. पाटील, ग्राहक मंचचे अध्यक्ष ए. ए. खडसे यांचे यावेळी भाषण झाले. संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भोकरे यांनी स्वागत केले. तर सचिव अशोक शेलार यांनी आभार मानले. अ‍ॅड. एस. टी. जाधव, अ‍ॅड. एच. के. पाटील, अ‍ॅड.व्ही. के. मोरे, अ‍ॅड. सुरेश भोसले, अ‍ॅड. प्रताप हारूगडे, अ‍ॅड. डी. बी.धावते, अ‍ॅड. प्रमोद सुतार, उपाध्यक्ष सचिन पाटील, पदाधिकारी  उपस्थित होते.